Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Amravati News: अमरावती शहरात गांजा तस्करीचा पर्दाफाश; सुपर हायवेवर 10 किलो गांजासह 6.24 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात
- क्राईम - महाराष्ट्र

Amravati News: अमरावती शहरात गांजा तस्करीचा पर्दाफाश; सुपर हायवेवर 10 किलो गांजासह 6.24 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात

अमरावती शहर गुन्हे शाखेची सुपर हायवेवर मोठी कारवाई! बडनेरा-अमरावती मार्गावर 10 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, 6 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमरावती: शहरात गांजा आणि एमडीसारख्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीच्या घटना समोर येत असतानाच अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. सुपर हायवेवर नाकाबंदी करून पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 किलो गांजा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथून अमरावती शहराच्या दिशेने दुचाकीवरून गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुपर हायवेवर तातडीने नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पद दुचाकीवरून येणाऱ्या चालकाला पोलिसांनी थांबवून ताब्यात घेतले. त्यानंतर दुचाकीवर असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 10 किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 5 लाख 13 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईत पोलिसांनी गांजा, तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 6 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अब्दुल समीर सज्जाद हुसेन (रा. यास्मिन नगर, अमरावती) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/