Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Dhule: धुळे ACBची मोठी कारवाई! थकीत वेतनासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप; शिरपूरमधील मुख्याध्यापक ताब्यात
- क्राईम - महाराष्ट्र

Dhule: धुळे ACBची मोठी कारवाई! थकीत वेतनासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप; शिरपूरमधील मुख्याध्यापक ताब्यात

शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला थकीत वेतनाच्या मोबदल्यात कथित २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे ACBने रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे: थकीत वेतन मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शिरपूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून उर्वरित 2 हजार रुपयांची कथित लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सुनील रामभाऊ खेडकर (वय 57) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते जामन्यापाडा, तालुका शिरपूर येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एसीबीकडे दाखल तक्रारीनुसार, 32 वर्षीय तक्रारदार एप्रिल 2026 पर्यंत या आश्रमशाळेत रोजंदारीवर चौकीदार म्हणून काम करत होते. आपल्या प्रलंबित वेतनाबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापकांची भेट घेतली होती. त्यावेळी वेतन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. यापैकी 8 हजार रुपये फोनपेच्या माध्यमातून स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या खात्यात 22 हजार 825 रुपये जमा झाले. मात्र, उर्वरित 2 हजार रुपयांसाठी वारंवार संपर्क करून पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची 25 नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. यावेळी उर्वरित 2 हजार रुपये स्वीकारताना खेडकर यांना पथकाने पकडले. नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/