Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Pune Bopdev Ghat Accident: पुण्यात बोपदेव घाटात मृत्यूचा थरार! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर
- पुणे - महाराष्ट्र

Pune Bopdev Ghat Accident: पुण्यात बोपदेव घाटात मृत्यूचा थरार! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

पुण्यातील बोपदेव घाट परिसरात भरधाव आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. बोपदेव घाट परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (25 नोव्हेंबर) महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्याला धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयातील काही विद्यार्थी बोपदेव घाट परिसरातील बस थांब्यावर उभे होते. याचवेळी घाटाच्या तीव्र उतारावरून एक आयशर टेम्पो वेगाने खाली येत होता. उतारावर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच मोठा अनर्थ घडला.

नियंत्रण सुटलेला टेम्पो सर्वप्रथम एका वाहनाला धडकला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने तो घुसला. या धडकेत अनेक विद्यार्थी टेम्पोच्या खाली सापडले. विद्यार्थ्यांना धडक दिल्यानंतरही टेम्पोचा वेग कमी झाला नाही. पुढे असलेल्या इतर वाहनांनाही त्याने जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघाताची भीषणता आणखी वाढली.

या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. टेम्पोचे ब्रेक निकामी झाले होते का, वाहनाच्या अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले की अन्य काही तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/