Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! 37 अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे; 1.88 लाखांचा मुद्देमाल जप्त
- महाराष्ट्र

अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! 37 अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे; 1.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. एकाच दिवसात 37 ठिकाणी छापे टाकून 37 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 1 लाख 88 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगर: जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातील 37 ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी तब्बल 37 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत 1 लाख 88 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम राबवली. अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहा स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी केली. यामध्ये अवैध दारू विक्रीचे 24, तर जुगाराचे 13 असे एकूण 37 गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईत नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 11 गुन्हे दाखल झाले. यामध्ये अवैध दारू विक्रीचे 9 आणि जुगाराचे 2 गुन्हे आहेत. याशिवाय शेवगाव, एमआयडीसी, कोपरगाव तालुका, कोपरगाव शहर, राहाता आणि शिर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याने अवैध व्यवसायांवर पोलिसांचा वचक निर्माण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/