Sangli DCC Bank : सांगलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरवलाय. 2 वर्ष संचालक नसणे व अनुभव दाखल या मुद्यावरून कोल्हापूर खंडपीठाने उमेदवारी रद्द केली आहे. गोपीचंद पडळकारांची उमेदवारी रद्द केल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. पडळकर यांनी निवडणुकीतील अर्ज अवैध ठरल्याने भाजपला मोठा हादरा बसला आहे. पडळकरांचा राजीनामा अवैध ठरल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता या निवडणुकीत महायुतीचे नेते काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निर्णयाचे सावंत यांच्याकडून स्वागत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने गोपीचंद पडळकरांचा अर्ज अवैध ठरवलाय. कोर्टाच्या निर्णयाचा माजी आमदार विक्रम सावंत यांनी स्वागत केलंय, न्यायव्यवस्था जिवंत आहे,असं मत व्यक्त त्यांनी व्यक्त केलं. ज्यांनी ज्यांनी खोटी कागदपत्र देण्यासाठी मदत केली आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत,अशी मागणी देखील याचिकाकर्ते सावंत यांनी केली आहे.
