Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • बीडमध्ये होमिओपॅथीच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; 5 वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी, आरोपीला अटक
- क्राईम - मराठवाडा - महाराष्ट्र

बीडमध्ये होमिओपॅथीच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; 5 वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी, आरोपीला अटक

बीडमध्ये होमिओपॅथी महाविद्यालयातील 22 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून प्राध्यापक डॉ. अनिल अहमद यांना पोलिसांनी अटक केली. परीक्षेत नापास करण्याची आणि पाच वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

बीड: होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या 22 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्राध्यापक असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. अनिल अहमद असे आरोपीचे नाव असून, पिडीत विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मिळ्यालेल्या महितीनुसार, संबंधित विद्यार्थीनी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. पीसीओडीच्या त्रासामुळे ती नियमित वैद्यकीय तपासणीसाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात जात होती. याच दरम्यान आरोपी डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थिनीने या वर्तनाला विरोध केला असता, आरोपीने तिला धमकावल्याचा आरोप आहे. याबाबत कोणाकडेही तक्रार केल्यास परीक्षेत कमी गुण देईन, पाच वर्षे एकाच वर्गात ठेवीन आणि उत्तीर्ण होऊ देणार नाही, अशी भीती दाखवून तिला गप्प राहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

11 महिन्यांत तीन ते चार वेळा गैरवर्तन केल्याचा आरोप

पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2026 मध्ये तपासणीच्या निमित्ताने आरोपीने प्रथम तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर उपचार आणि तपासणीसाठी वारंवार बोलावून पुढील 11 महिन्यांत तीन ते चार वेळा अशाच प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप आहे.

सुरुवातीला शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/