मराठवाडा
महाराष्ट्र
शेती
दुष्काळी बीडमध्ये तरुण शेतकऱ्याचा शेतीत विक्रम! सात एकरांत शिमला मिरचीचे 50 टन उत्पादन; पहिल्याच तोडणीत 19 लाखांचे उत्पन्न
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युवा शेतकरी बालासाहेब थोरात यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून सात एकरांत शिमला मिरचीचे 50 टन विक्रमी उत्पादन घेतले. पहिल्याच तोड्यात 19 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर यशस्वी शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.


